श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी/नागपुर : 7 जुलै 2026
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार मतदार याद्या सखोल पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम 2026 अंतर्गत कामठी–मौदा विधानसभा क्षेत्रातील BLA प्रतिनिधींचे प्रशिक्षण शिबिर ग्रीन लीफ लॉन, रनाळा येथे आयोजित करण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन प्रा. अवंतिका रमेश लेकुरवाळे BLA-1, कामठी–मौदा विधानसभा, व शकूर नागाणी (महासचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या प्रशिक्षणाला प्रामुख्याने माजी मंत्री सुनील केदार, तसेच रामटेक निर्वाचन क्षेत्राचे सन्माननीय खासदार श्यामकुमार बर्वे,माजी जिल्हा परिषद सभापती प्रा. अवंतिका रमेश लेकुरवाळे, शकूर नागाणी, माजी सभापती दिशा चनकापुरे, माजी उपसभापती दिलीप वंजारी, सोनू कुथे (पंचायत समिती सदस्य), नगरसेवक आशिफ शरमतीया, सातीका खांडेकर, अभिषेक चिमणकर, जुही अन्सारी, आलिया तबस्सुम अमीन रशीद, हसीना बानो फारूक कुरेशी, तमिना प्रवीण साकिब राकिब, सुधीर शहाणे (कृ. उ. बा. स.), रत्नादीप रंगारी, रमेश विघे, सरपंच मनोज कुथे (पलसाड), दुमदेवजी नाटकर (माजी सरपंच), प्रकाश गजभिये, प्रकाश आगलावे तसेच मोठ्या संख्येने BLA प्रतिनिधी व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री सुनील केदार यांनी बूथस्तरावरील संघटन अधिक सक्षम व सक्रिय करण्याच्या सूचना देत प्रत्येक कार्यकर्त्याने मतदार यादीतील प्रत्येक नावाची पडताळणी करण्याचे आवाहन केले.
खासदार श्यामकुमार बर्वे यांनी प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत कायम राहावे आणि कोणत्याही पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार अबाधित राहावा यासाठी कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन जनजागृती करण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमात प्रज्वल तट्टे व गौतमजी नितनवरे यांनी SIR प्रक्रियेची सविस्तर माहिती देत BLA प्रतिनिधींना प्रभावी मार्गदर्शन केले. सध्या सुरू असलेल्या मतदार याद्या सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात पात्र मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक बूथवर BLA यांनी सतर्क राहून नागरिकांमध्ये जनजागृती करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेणे आणि कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही यासाठी दक्षता घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.












