श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी/नागपुर : 7 जुलै 2026.
स्वर्गीय पार्थ नवलकिशोर दडमल यांच्या वाढदिवसानिमित्त कामठी येथील अनाथ आश्रमामध्ये कामठी क्रृ.उ.बा.समिती चे संचालक नवलकिशोर डडमल यांच्या परिवारातर्फे एक प्रेरणादायी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या वह्यांचे (नोटबुक) वाटप करण्यात आले. तसेच सर्व मुलांना एक वेळेचा अल्पोपहार व स्वादिष्ट भोजन देण्यात आले.
या प्रसंगी मुलांशी आपुलकीने संवाद साधून त्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले. समाजातील गरजू व वंचित घटकांप्रती सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांमुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.
या कार्यक्रमास सोशल मीडिया प्रमुख पूर्वल तकित, बाजार समिती संचालक भालेरावजी, सामाजिक कार्यकर्ते सचिन ढोले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय पार्थ नवलकिशोर दडमल यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून समाजसेवेचा हा वसा पुढेही अखंडपणे सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.

समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारे असे उपक्रम अधिकाधिक राबविले जावेत, हीच या कार्यक्रमामागील भावना असून शिक्षण आणि सेवाभाव हाच खरा समाजपरिवर्तनाचा मार्ग असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.













