श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
मुंबई : 23 जुलै 2026.
सोशल मीडियावर एका पोलिसाच्या वायरल झालेल्या व्हिडिओमुळे मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला होता. या व्हिडिओमध्ये एक पोलीस कर्मचारी काल मुंबईत झालेल्या काक्रोच जनता पार्टी च्या आंदोलक विद्यार्थ्यांना गाडीत नेतांना धमकावताना दिसत असून, “पुन्हा दिसले तर 50-50 ग्रॅमची पावडर टाकेन तुमच्या खिशात टाकुन जिंदगी बरबाद करुन टाकीन ,” असे म्हणताना ऐकू येत आहे.
दरम्यान या विडिओमुळे मुंबई पोलीस मोठ्या प्रमाणात ट्रोल होतांना बघितले. सायन पोलीस स्टेशनचा चालक पवन सांगळे याला मुंबई पोलिसांनी अतितातकाळ निलंबित केले आहे. विद्यार्थ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
राजकीय आक्षेप
मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, वंचित नेते बाळासाहेब आंबेडकर, कांग्रेस नेता हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित झाला होता.
तातडीची कारवाई
या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र गृहखात्याच्या आदेशानुसार व मुंबई पोलिसांनी पवन सांगळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.









