चिमुकल्यांनी साकारल्या स्वातंत्र्यवीरांच्या यशोगाथा
श्री. सुनील उत्तमराव साळवे (9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी/नागपुर : 16 आँगष्ट 2026.
नागपुर जिल्ह्यातील कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरात 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हरदास विद्यालय आणि ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूलच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात ध्वजारोहणाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख, ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखाताई कुंभारे यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजाचे विधिवत ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी देशाच्या एकता, अखंडतेची आणि संविधानिक मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेतली. यावेळी हरदास विद्यालय व ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, प्रेरणादायी भाषणे, नृत्य, योगा प्रदर्शन, सैनिकांच्या शौर्यावर आधारित नाटिका तसेच थरारक मानव मनोरा सादर करून सर्वांची मने जिंकली. लहानग्यांनी स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषेत दिलेली सादरीकरणे विशेष आकर्षण ठरली.

ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान विसरू नये असे आवाहन केले. त्यांनी शिक्षणासोबत संस्कार, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, हरदास विद्यालय, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. देशभक्तीच्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलेला हा स्वातंत्र्यदिन सोहळा उपस्थितांच्या मनावर अविस्मरणीय छाप उमटवून गेला.
या कार्यक्रमाला अजय कदम, नियाज कुरेशी, उदास बंसोड, आकाश बोकरे, सुभाष सोमकुवर, दिपक सिरीया, चंदु लांजेवार,दिपंकर गणविर, अनुभव पाटील, अंकुश बांबोर्डे, विलास बंसोड, विनय बांबोर्डे, सागर भावे, रेखा भावे, रजनी लिंगायत, सुनिल वानखेड़े, राजेश शंभरकर, चंदु कापसे, सचिन नेवारे, वंदना आळे, शालु सावतकर, सुमन घरडे, हरदास विद्यालय चे मुख्याध्यापक देवेंद्र जगताप, ड्रॅगन इंटरनॅशन स्कूल च्या मुख्याध्यापिका अंबरीन फातिमा, विनोद जुमडे, प्रफुल वासे, अरविंद वाळके, सुकेशीनी मुरारकर, विशाखा पाटील, निशा कापसे, इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.











