श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी/नागपुर : 16 आँगष्ट 2026.
येथील नवीन कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस महेश आंधळे यांना देश्याच्या स्वातंत्र्यादिनी नागपुरातील डिविजनल कमिशनर कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल विशेष सेवा पदक देऊन सम्मानित करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनी आयोजित कार्यक्रमात नागपूर शहर पोलीस दलात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सम्मान करण्यात आला होता. महेश आंधळे यांनी अमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र अभियानात पोलीस स्टेशनच्या सीमेतील शाळा, कॉलेज, इत्यादी ठिकाणी भेटी देऊन नशा मुक्तीसाठी कार्यक्रम राबऊन विद्यार्थ्यात जनजागृती साठी भरपूर प्रयत्न केले.
नशा मुक्तीसाठी खाजगी व शासकीय आय टी आय, शाळा, कॉलेज इत्यादी ठिकाणी नशा मुक्तीसाठी जनजागृती करीत नशा मुळे होणारे विपरीत परिणाम विध्यार्थ्यांना समजाऊन सांगण्यात आले.










