श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
रामटेक /नागपुर : 29 आँगष्ट 2026.
राज्यमंत्री अँड.आशिष जयस्वाल यांचा अंगरक्षक अजय सलामे याने एका 26 वर्षिय महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर अंगरक्षकाविरोधात नागपुर जिल्ह्यातील रामटेक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. पीडित महिला विवाहित असुन विधवा आहे. राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा अंगरक्षक असलेल्या अजय सलामे वर त्याच्या बायकोने देखील गंभीर आरोप केले आहेत. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय सदाशिव सलामे वय (28 वर्षे) असं गुन्हा दाखल झालेल्या अंगरक्षकाचे नाव आहे. अजय सलामे याच्याविरुद्ध रामटेक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. सलामेने त्या विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केलं. तसंच फोटो आणि व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची सुद्धा पीडित महिलेला धमकी दिली असल्याचे समजते.
सलामे याच्याविरुद्ध BNS कलम 69, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने स्वतःच्या आणि मुलांच्या जीविताला धोका असल्याचे पोलिसांना सांगितले. या घटनेप्रकरणी पीडित महिलेने पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि एसडीपीओ रमेश बरकते यांची भेट घेऊन आरोपी अजय सलामे वर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार अजय सलामे याची एक वकिल मैत्रिणीने पीडित महिलेला व तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे ही समजते. त्यामुळे या प्रकरणात सलामेसह वकिल मैत्रिणी विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. महिलेच्या तक्रारीतील आरोपांची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती यावले आणि राजकुमार थोरात यांच्याकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची कानकुन लागताच आरोपी अंगरक्षक अजय सलामे हा फरार झाल्याचे समजते.











