श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी/नागपुर :3 सप्टेंबर 2026
नागपुरच्या आंतरराष्ट्रीय ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या महादान दायिका आधारस्तंभ, स्म्रृतीशेष मॅडम नोरिको ओगावा यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी ड्रॅगन पॅलेस परिसरात “पुण्यानुमोदन” तथा महापरित्राण पाठ व धम्मदान सोहळा धम्ममय वातावरणात पार पडला. याप्रसंगी ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख ॲड . सुलेखा कुंभारे यांच्या पुढाकारातून या विशेष धार्मिक व सामाजिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .
बुधवारी सकाळी 10 वाजता पूज्य भिक्खू संघ व भिक्खुणी साक्य धम्मदिन्ना अयाजी, भिक्खुणी संघाच्या उपस्थितीत बुद्ध वंदना, परिक्रमा सूत्रांचे सामूहिक संग्रहण, महापरित्राण पाठ आणि धम्मदेशना संपन्न झाली. सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते भिक्खू व भिक्खुणी संघाला चिवरदान, फलदान, भोजनदान करण्यात आले. सर्व कुशल कर्माचे पुण्य स्मृतिशेष महादायिका मॅडम नोरिको ओगावा यांच्या स्मृती आणि समाजातील ज्येष्ठ व प्रियजनांना समर्पित करण्यात आले.


भगवान बुद्धांची नैतिक मूल्ये आचरणात आणणे काळाची गरज- पुज्य भिक्खुणी साक्य धम्मदिन्ना ‘केवळ धम्ममार्गावर चालणे पुरेसे नाही . समाजातील प्रत्येकाला धम्माच्या प्रवाहात सामिल करणे, त्यांच्या जीवनात प्रज्ञा, शील आणि करुणेची रुजवण करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. तथागत भगवान बुद्धांच्या ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या मूलमंत्राला केंद्रस्थानी ठेवून सामाजिक परिवर्तनासाठी निरंतर कार्य झाले पाहिजे असे पुज्य भिक्खुणी साक्य धम्मदिन्ना यांनी यावेळी सांगितले.




भगवान बुद्धांच्या काळातील दानशील उपासक- उपासिकांच्या परंपरेचा दाखला देत, अँड. सुलेखा कुंभारे यांच्या कार्याचा भिक्खू- भिक्खुणी संघाने गौरव केला.
या महापरित्राणपाठ प्रसंगी अजय कदम, उदास बंसोड, दिपंकर गणविर,माजी जि.प.सदस्य दिनेश बंसोड, रवी रंगारी, भिमराव फुसे, अरविंद वाळके, शिवपाल चंदनखेडे, राहूल बागडे, सुभाष सोमकुवर, अंकुश बांबोर्डे, अविनाश उकेश, रमेश घरडे, विष्णु ठवरे, अनुभव पाटील, चंदु लांजेवार, संदीप कांबळे, आकाश भोकरे, नरेश वासनिक, निरज लोणारे, प्रमोद खोब्रागडे, मंगेश
सामाजिक बांधिलकी आणि दानाचा सुंदर संगम
ड्रॅगन पॅलेस टेम्पल केवळ धार्मिक केंद्र नाही. सामाजिक समता, बंधुभाव प्रबोधनाचे ऊर्जास्थान ठरले आहे. समाजातील वंचित व गरजू घटकांना बळ देण्यासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांची उपस्थितांनी प्रशंसा केली.
पुज्यभिक्खुणी शाक्यधम्मदिन्ना अयाजी यांच्यासह पुज्य भदंत मेत्तानंद महाथेरो, पुज्य भदंत उपीयरत्न महाथेरो म्यानमार, पुज्य भदंत अगधम्मा, पुज्य भदंत नारादा, पुज्य भदंत ज्ञानातीलोका, पुज्य भदंत सागरा कुशीनगर उत्तर प्रदेश यांनी महाउपासिका मॅडम नोरीको ओगावा यांच्या सातव्या स्मृति दिनानिमित्त महापरित्राण पाठ घेवून धम्मदेसना दिली.

लांजेवार, विनय बांबोर्डे, विलास बंसोड, देवेंद्र जगताप, राजेश गजभिये, विनोद जुमडे, दिलीप बोबडे, प्रफुल वासे, विजय अलोने, शालिग्राम अडकने, सुकेशीनी मुरारकर, नंदा गोडघाटे, रेखा भावे, रजनी लिंगायत, वंदना भगत, जया पानतावने, रत्नमाला मेश्राम, विशाखा कांबळे, किरण राऊत, सिमा सोमकुवर, छाया गाडगे,
अस्मिता बागडे, अल्का तांबे, प्रतिभा वासनिक, वर्षा राऊत, सुभदा राऊत, रजनी गजभिये, रेखा पाटील, उषा भावे, शिल्पा नागदेवे, देवांगना गजभिये, इंदिरा खांडेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.











