श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 3 सप्टेंबर 2026.
नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आगामी सण-उत्सवांच्या (गणेशोत्सव, नवरात्र, पोळा,) पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेतला आहे.
या बंदीबाबतचे महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
बंदीचा कालावधी:
हा आदेश 3 सप्टेंबर 2026 च्या मध्यरात्रीपासून ते 1 नोव्हेंबर 2026 पर्यंत लागू राहील.
कशावर बंदी आहे?
डीजे सिस्टीम, डीजे वाहने, हाय-पॉवर मॉडिफाइड साऊंड सिस्टम, डिम/बीम लाईट्स आणि डोळ्यांना इजा पोहचवणारे लेझर लाईट्स या सर्वांच्या वापरावर कडक निर्बंध आहेत.कायदेशीर कारवाई: भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम 163 अंतर्गत हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पोलीस कारवाई केली जाईल आणि त्यांचे साहित्य जप्त केले जाऊ शकते.सणांच्या मिरवणुकीत होणारे ध्वनी प्रदूषण, लेझर लाईट्समुळे लोकांच्या डोळ्यांना होणारी इजा आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.











