कॉंग्रेस, बसपा, रिपाइं, सामाजिक संघटना रस्त्यांवर!
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपूर : 20 सप्टेंबर 2026 .
भाजप सरकारने अत्यंत घाईगर्दीत काल लोकार्पण केलेल्या आवळे बाबु चौक ते दिघोरी उड्डाणपुलाच्या नावावरून सोहळयाच्यावेळी काँग्रेस, बसपा, रिपाइंसह आंबेडकरी सामाजिक संघटनांनी जोरदार विरोध दर्शविला. रस्यावर उतरून सरकारच्या या निर्णयाचा निषेध करीत शहरातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. कुठलेही योगदान नसलेल्या व्यक्तीचे नाव देऊन, महापुरूषांचा अवमान केल्याची टीका केली. हे नाव सरकारने मागे घ्यावे अन्यथा कायदेशीर लढ्यासोबतच इतरही लढा उभारण्याचा इशारा दिला. रेशीमबाग चौक, कमाल चौक व इतरही ठिकाणी सरकारच्या या भूमिकेविरोधात निषेधाचे सूर उमटले.
उड्डाणपुलाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल नाव दया-उत्तर नागपुर कॉंग्रेस कमेटी

भाजपकडून केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपुल असे नामकरण झाल्याचे जाहीर केले. यासंबंधी कुठल्याही सरकारी यंत्रणांकडून नाव जाहीर करण्यात आले नसल्याकडे लक्ष वेधत शहरात विरोधाचा सूर उमटला. काँग्रेसच्या तत्कालीन खासदार सरोज खापर्डे यांच्या निधीतून कमाल चौक ते गोळीबार चौक असा पहिला उड्डाणपुल बांधण्यात आला होता. पण हा पुल जीर्ण व जुना झाल्याने तो तोडण्यात आला व त्याजागी नवीन उड्डाणपूल 1 हजार कोटी रुपये खर्च करून नवीन उड्डाणपूल बांधण्यात आला. मात्र घाईघाईने या उड्डाणपुलाचे लोकार्पण करीत या पुलाला केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव भाजप तर्फे आयोजित कालच्या कार्यक्रमात काल जाहीर केले. ही कृती जनक्षोभ भडकावणारी असल्याचा संताप रिपाइं, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, सामाजिक संघटनांनी व्यक्त केला. कमाल चौकात या पहिल्या उड्डाणपुलाची आठवण करून देत या मार्गाला डॉ. आंबेडकर मार्ग व त्याच नावाने उड्डाणपुल असल्याचे सांगितले. यावेळी आंबेडकरी चळवळीतील बाळू घरडे, दिनेश अंडरसहारे, डॉ. मनोज मेश्राम, धर्मपाल गजभिये, शुभम घरडे, बागडे, राहुल मेश्राम, संजय आवळे, महेंद्र लोणारे, निहार चव्हाण आदींसह समुहघोष संघटनेचे संजय फुलझेले, उमेश बोरकर, सुरेश पाटील, रिपब्लिकन मुव्हमेंटचे नरेश वाहाणे, मनोज शेंडे, प्रमोद किटके, पृथ्वी गोटे, जगदीश मुळे आदींनीही या निर्णयाचा विरोध केला.
आंबेडकर मार्ग व पुलासही डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामकरण केले होते. ते आजतागायत असल्याचा उल्लेख शासकीय दस्तऐवज मध्ये आढळतो.
बसपाचे नागपुरच्या रेशीमबागेत आंदोलन

पोलिसांनी सकाळपासूनच बसपा कार्यकर्त्यांची धरपकड करण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्ते दिवसभर हाती लागले नाहीत. सायंकाळच्या सुमारास अनेकजण रेशीमबाग चौकात प्रकटले. त्यांनी हेडगेवार नावास विरोध करून, सरकारने समजून घ्यावे असा सल्ला दिला. उड्डाणपुलास डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा सम्राट अशोक यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली. यावेळी सरकारचा निषेध नोंदवित घोषणाबाजीही केली. त्यानंतर अजनी पोलिसांनी बसपाचे प्रदेश महासचिव नाराजेकर, जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार, शहराध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे, नागोराव जयकर, प्रदेश सचिवद्वय प्रफुल्ल मानके, विवेक हाडके, अमित बनसोड यांच्यासह 25-30 कार्यकर्त्याना ताब्यात घेतले.
दावा आंबेडकरी संघटनांचा आहे. परंतु, राज्यात भाजपसारख्या मनुवादी सरकारने मनमानी, बहुमताचा गैरवापर आम्ही खपवुन घेणार नाही. उड्डाणपूलाचे हेडगेवार यांचे नाव मागे घेण्यास भाग पाडु असा सज्जड इशारा बसपा नेत्यांनी ही दिला.

कमाल चौकात कॉंग्रेसचा रोष

कमाल चौकात युवक कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, नगरसेवक गौतम अंबादे, अभिषेक शंभरकर, आसीफ शेख, दिनेश यादव, मनोज बनसोड, नगरसेविका कल्पना द्रोणकर, बंडोपंत टेंभुर्णे, चेतन तरारे, निलेश खोरगडे मोठया संख्येत कार्यकर्ते एकत्र आले. काल सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत सरकारच्या निर्णयाचा जोरदार विरोध करीत घोषणाबाजी करण्यात आली. नाव न बदलल्यास कमाल चौकात उड्डाणपुल रोखून धरण्याचा इशारा दिला. पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन, नंतर सोडून दिले.सरकार ने मुजोरीने नाव बदलले. हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान असल्याचा रोष समाजात पसरला आहे असे म्हणत कांग्रेस नेत्यांनी भाजप सरकार व नेत्यांचा निषेध केला.













