श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
वानाडोंगरी-हिंगणा /नागपुर : 20 सप्टेंबर 2026. आज दुपारी अंदाजे 2 वाजता वाजता हिंगणा तालुक्यातील शालिनीताई मेघे हॉस्पिटल परिसरात बांधकाम साहित्य घेऊन आलेल्या अशोक लेलँड कंपनीच्या ट्रक क्रमांक MH-40 CT-3161 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने, बेदरकारपणे व निष्काळजीपणे चालवून हॉस्पिटलच्या आवारातून बाहेर जात असलेले 1) श्यामकृष्णन पी. पी. के., वय 26 वर्षे, 2) अमन के. पी., वय 23 वर्षे व 3) श्रद्धा विकी वासेकर यांना मागून जोरदार धडक दिली.
सदर अपघातात श्यामकृष्णन पी. पी. के. यांचा मृत्यू झाला असून अमन के. पी. व श्रद्धा विकी वासेकर यांच्या पायांना फ्रॅक्चर झाले आहे. दोन्ही जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार शामाक्रृष्णन् पी. पी. के. हे इंजिनिअर म्हणून येथील बांधकामावर कार्यरत होते. इतर दोन जखमी बद्दल सविस्तर माहिती मिळायची आहे.
फिर्यादी धनंजय गायकवाड, व्यवसाय सिक्युरिटी सुपरवायझर, शालिनीताई मेघे हॉस्पिटल यांच्या तक्रारीवरून MIDC पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन यांनी घटनेसंदर्भात FIR दाखल केला आहे.
सदर अपघातानंतर आरोपी ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. घटनास्थळी पंचनामा कारवाई सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.












