Vansh News Digital Web portal online.
सावनेर: 24 सप्टेंबर 2026.
शेतीचा शेतरस्ता खुला करावा, शेतीचे अधिकृत मोजमाप करण्यात यावे आणि शेती हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध FIR दाखल करावी, या मागण्यांसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याची घोषणा करणारे शेतकरी निखिलकुमार गणेर यांना सावनेर पोलिसांनी रात्री ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. गणेर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना संपूर्ण रात्र सांवनेर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. त्यानंतर रात्री 12 वाजल्यापासून त्यांनी सावनेर पोलिस ठाण्यातच बेमुदत त्यांनी सावनेर पोलिस ठाण्यातच बेमुदत अत्रात्याग आमरण उपोषण सुरू केले आहे.

” मागण्या मान्य होईपर्यंत माझे उपोषण राहणार सुरुच – निखिलकुमार गणेर “
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा माझा निर्णय होता. मात्र, त्यापूर्वी पोलिसांनी मला ताब्यात घेतले. आता माझ्या सर्व मागण्या मान्य होईपर्यत सावनेर पोलिस ठाण्यातच आमरण अत्रत्याग उपोषण सुरू ठेवणार आहे,” – निखिलकुमार गणेर, युवा शेतकरी
या प्रकरणासंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही असे अधिकारी टोलवाटोलवी ची उत्तरे देत आहेत. या प्रकरणात सावनेर पोलिस प्रशासनाची अधिकृत भूमिका तसेच महसूल विभागाकडून याबाबतचे स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही.
यासंदर्भात डी वाय एस पी सागर खडें यांच्याशी डिटेन करून ठेवण्यात आलेल्या युवकाबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडे माहिती नसल्याने माहिती घेऊन सांगतो असे स्थानिक पत्रकारांना सांगितले. पोलिस निरीक्षक ऋतुजा जाधव यांच्याशी यासंदर्भात प्रकरण समजून घेण्याचे प्रयत्न केले. त्यांनी फोनवर माहिती देण्यास नकार दिला. पोलिस स्टेशन ला या माहिती देऊ असे त्यांनी पत्रकारांना सांगितल्याची माहिती पुढे येत आहे.












