श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
मध्यप्रदेश : 7 एप्रिल 2026.
मध्य प्रदेशाच्या छत्रापूर एक धक्कादायक घटना समोर आलीये. ज्यामुळे लग्नाच्या नातेसंबंधांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. याठिकाणी मामी आपल्या भाच्यासोबत पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मंदिरात जाऊन येते असं सांगून महिला भाच्यासोबत पळून गेली आहे.
सिजाईमध्ये राहणाऱ्या 40 वर्षीय बरे कुशवाहा यांच्या 35 वर्षीय पत्नीने रविवारी घरातून निघताना विंध्यवासिनी मंदिरात जात असल्याचं सांगितलं होतं. पतीला वाटलं की, देवळात जाऊन आल्यानंतर ती घरी परतेल. मात्र तो पळून जाण्याचा एक कट रचला होता. घरातून निघाल्यानंतर ती महिला मंदिरात जाण्याऐवजी थेट कबराईला गेल्याचं समोर आले आहे.
पतीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यांची पत्नीचे त्यांच्या 25 वर्षीय भाचा कमलेश कुशवाहासोबत प्रेमसंबंध होते. यामुळेच ती पळून गेली आहे. तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या भाच्याच्या आणि त्याच्या मामी या कृत्यामुळे नाते संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
बरे कुशवाहाने पोलिसांना सांगितलं की, त्याची पत्नी घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि पैसे घेऊन गेलीये. बरे कुशवाह यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. पोलिसांनी बेपत्ता व्यक्ती आणि चोरीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.










