श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 11 जुलै 2026.
सामाजिक सुरक्षा विभागाने आज (दि.11) शनिवारी विदेशी व परराज्यातील महिलांकडून सुरु असलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्यावर धाड टाकुन टोळी गजाआड केली आहे. पोलीस स्टेशन अंबाझरी हद्दीत हा प्रकार उघडकीस आला. आरोपीचे नाव सचिन माणिकराव महाजन (वय : 38 वर्ष, रा: प्लॉट नंबर 179, भवानीनगर पूना रोड) असे आहे.
अंबाझरी पोलिस स्टेशन हद्दीत हॉटेल पेटल इनचे समोरील सार्वजनिक रस्त्यावर गोकुळपेठ परिसरात हा सर्व प्रकार आंबट शौकीन हेरून केला जात होता.
सुटका केलेल्या पीडित महिलामध्ये उझबेकिस्तान देशातील 2, पंजाब, दिल्ली, कोलकत्ता राज्यातील 3 पीडित महिलाचा समावेश आहे. अद्याप या टोळीतील समीर उर्फ मनीष उर्फ गगन ठाकूर, राहुल आणि पूजा नावाची महिला फरार आहेत.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे आरोपी ‘लॉगिन पर्सनल मीटिंग’ (Login Personal Meeting) नावाच्या एका विशेष मोबाईल ॲपचा वापर करून ग्राहकांशी संपर्क साधत असत आणि त्यांना तरुणींचे फोटो व इतर माहिती पुरवत असत. पीडित तरुणींना अत्यंत कमी वेळात आणि अल्पावधीत जास्त पैसे कमवण्याचे मोठे आमिष दाखवून, त्यांना नागपुरात आणून त्यांच्याकडून बळजबरीने देहव्यापार करून घेतला जात होता. गोकुळपेठ भागातील हॉटेल पेटल इनच्यासमोरील सार्वजनिक रस्त्यावर हे रॅकेट सक्रिय असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहितीच्या आधारे सामाजिक सुरक्षा विभागाने तात्काळ सापळा रचला. पोलिसांनी या कारवाईसाठी एक बनावट ग्राहक (डिकॉय ऑपरेशन) तयार करून पाठवले आणि पंचांच्या उपस्थितीत गोकुळपेठ परिसरातील हॉटेल पेटल इनसमोरील मुख्य रस्त्यावर अचानक छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी आरोपी सचिन महाजन याला रंगेहात पकडले. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे 5,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 5 लाख रुपये किमतीची एक स्विफ्ट डिझायर कार, 10 हजार रुपयांचा एक मोबाईल फोन आणि 8 हजार रुपयांची रोख रक्कम समाविष्ट आहे..
या संपूर्ण प्रकरणाची अंबाझारी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. फरार आणि अटक आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 143(2)(3) आणि अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा, 1956 च्या कलम 3, 4 आणि 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अंबाझारी पोलीस पुढील तपास करत आहेत.











