श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
जळगाव /महाराष्ट्र : 28 जुलै 2026.
महाराष्ट्रातील बहुचर्चित 160 कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्यात नाशिक विशेष तपास पथकाने (SIT) मुख्य आरोपी आणि भाजप पदाधिकारी संजय गरुड याला सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील एका फार्महाऊसवरून अटक केली आहे. तो जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचा अध्यक्ष आणि बडा शिक्षण संस्थाचालक आहे.
भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांसोबत संजय गरुड चे जवळचे संबंध

घोटाळ्याचे स्वरूप:
तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांच्या मदतीने बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची तब्बल 160 कोटींची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
संस्थेवर आरोप:
संचालक संजय गरुड यांच्या शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेतील 177 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी अवघ्या एका दिवसात तयार करण्यात आले होते.
व्याप्ती :
या संपूर्ण घोटाळ्यात आतापर्यंत 200 पेक्षा अधिक शाळांमधील 1200 हून अधिक संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत.
160 कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्यात नाशिक गुन्हे शाखा आणि विशेष तपास पथकाने (SIT) आतापर्यंत मुख्य संशयितांसह 6 मुख्य आरोपींना अटक केली आहे.या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्या प्रमुख व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे आहेत
संजय भास्करराव गरुड:
शेंदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि भाजप पदाधिकारी (मुख्य संशयित आरोपी).
शशिकांत हिंगोणेकर:
जळगाव जिल्हा परिषदेचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी.
प्रशांत वाडिली:
धुळ्यातील या प्रकरणातील प्रमुख संशयित
सूत्रधार.दिलीप धोटे:
नागपूर जिल्ह्यातील विठ्ठल -रुक्मिणी प्राथमिक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष.या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये (उदा. नागपूर व इतर विभाग) झालेल्या तपासात रोहिणी कुंभार, सिद्धेश्वर काळुसे (शिक्षणाधिकारी) आणि शेषराव कुठे व हेमंत राठोड (शाळा मुख्याध्यापक) यांसह 16 हून अधिक जणांना आधीच बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणात 1200 हून अधिक संशयित आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत.
शालार्थ आयडी घोटाळ्यात आतापर्यंत पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये भाजपशी संबंधित नेते व अधिकारी यांनाच अटक झाल्याने विविध घोटाळ्यात भाजप चे नेते लिप्त असलेले दिसुन येतात त्यामुळे पार्टी विथ डिफरेंस म्हणणारे भाजप नेते ही घोटाळ्यापासुन स्वतःला दुर ठेऊ शकले नाही हे विशेष!









