श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 28 जुलै 2026.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार नागपुर जिल्ह्याला आँरेंज अलर्ट दिला असुन 28 ते 30 जुलै 2026 पर्यंत मुसळधार ते अतिमुसुळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज दि. 28 जुलै 2026 रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत 108 मिमी एवढी पावसाची नोंद झाली आहे. आज नागपुर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच उद्या हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अति मुसळधार पावसाची शक्यता बघता दि. 29 जुलै 2026 रोजी नागपूर शहर, महानगरपालिका, नागपुर ग्रामीण भागातील हिंगणा कामठी नागपुर ग्रामीण भागातील सर्व शाळा, अंगणवाडी खाजगी अंगणवाडी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद नागपुर यांनी आज सायंकाळी दिले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन 2005 मधील कलम 25 अन्वये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष या नात्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नागपुर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी हा आदेश जारी केला आहे.









