श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी: 12 आँगष्ट 2026.
आज रविवारी महामेट्रो च्या विरोधात भंडारा रोड उमिया गेट कापसी ता कामठी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांच्या नेतृत्वाखाली मोठे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

मागील अनेक दिवसानपासून भंडारा रोड कापसी परिसरात मेट्रो चे काम सुरु आहे, या कामा मुळे नागपुर भंडारा हायवेवर मोठ मोठे गड्डे पडून सम्पूर्ण रास्ता ख़राब झालेला आहे त्यामुळे उमिया गेट कापसी तसेच परी सरात रोज छोटे मोठे अपघात होने आणि मोठ्या प्रमाणात ट्राफीक जाम होने अनेक ठिकाणी पावसाचे पानी जमा होने या सारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत या सन्दर्भत सर्व विभाग प्रमुखाना निवेदन देऊन सुद्धा दखल घेतल्या जात नव्हती। त्या मुळे आज दि. 02/08/2026 ला उमिया गेट कापसी येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले आणि त्या ठिकाणी सर्व विभागाचे अधिकारी यांना येण्यास भाग पाडले. त्या मधे महामेट्रो चे अधिकारी नैशनल हायवे चे अधिकारी आणि पोलिस विभाग यांना तत्काळ उमिया गेट समोरील हायवे चा कट बंद करायला लावला सोबतच खराब झालेल्या रस्त्याचे तत्काळ 4/5 दिवसात दुरुस्ती करण्याचे आश्वासन सर्व अधिकार्यांकडून देण्यात आले.

त्या मुळे थोड्या प्रमाणात का होइना.ट्राफीक जाम व अपघात यावर नक्कीच आळा बसेल व लोकांची गैरसोय होणार नाही.
वरील आंदोलनात दिनेश ढोले माजी सदस्य जिल्हा परिषद नागपुर.रुपेश शेंदरे, आकाश बाराहाते, काळे सोमेश क्षिरसागर, अमोल निधान, निहाल कारेमोरे, विक्की करुटकर, सोनू वाड़ीभस्मे, विश्वास वडिभस्मे, गौरव बारहाते, विशाल शेंदरे, नथु शेंदरे, राकेश शेंडे, हटवार व परिसारातील पदाधिकारी नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









