श्री सुनील उत्तमराव साळवे (9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
सावनेर /नागपुर : 7 सप्टेंबर 2026
नागपुर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात असलेल्या महाराष्ट्र राज्य सावनेर उपविभागीय कार्यालयात काम करणारा वीज वितरण कंपनी च्या एका आउट सोरसिंग लाईनमेनला (कंत्राटी ) उप कार्यकारी अभियंता कार्यालय MSEB , सावनेर ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले.
अटकेत असलेल्या या लाईनमन चे नाव मुकेश चिंतामण मस्के, वय 36 वर्ष, पद- आउट सोरसिंग लाईनमेन (कंत्राटी ) असुन तो राहणार वार्ड नं 4. w c l रोड नागमंदिर जवळ सावनेर येथील रहिवासी आहे.
यातील तक्रारदार वय 28 वर्षे हा किरायाने फोटो स्टुडिओचे दुकान चालवतो तक्रारदराने त्याचे भाड्याचे दुकानाचे लाईट बिल 5170 रु भरले नसल्याने त्याचे लाईट चे मिटर कंत्राटी लाईनमन मुकेश मस्के यांनी काढून नेले व त्या नंतर लाईनमन याने हे तक्रारदारस बिला व्यतिरिक्त जास्तीचे पैश्याची मागणी केली तेव्हा तक्रारदार याने तक्रार दि 2/09/2026 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे रितसर तक्रार केली असता त्यावरून लाचेची पडताळणी पंचसमक्ष दि 3/09/2026 केली असता आरोपी इलोसे आरोपी यांनी तडजोडी अंती 8500रु लाच रक्कम मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
आज दिनांक 7/09/2026 रोजी पंचाचे समक्ष लाच रक्कम सापळा कार्यवाही केली असता इलोसे मुकेश मस्के यांनी तक्रारदार चे दुकानात येऊन लाच रक्कम 8500/ स्वीकारली.
गैरअर्जदार मुकेश मस्के कंत्राटी लाईनमन यांनी लाच मागणी पडताळणी दरम्यान केलेल्या 8500/-रु ची मागणी संबंधाने दिनांक 7/09/2026 रोजी तक्रारदार यांना व्हॉइस रेकॉर्ड व पंचासह लाच रक्कम घेऊन तक्रारदार याचे दुकानात इलोसे येऊन सदर लाच रक्कम 8500/- रु स्वीकारली. आरोपी यांना रेड हॅन्ड पकडण्यात आले आहे. तसेच त्याच वेळी आरोपी लाईनमन मुकेश मस्के (इलोसे) यास त्याच वेळी ताब्यात घेतले आहे.
पडताळणी दरम्यान केलेल्या 7/09/2026 रोजी इलोसे आरोपी यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन सावनेर शहर, ता सावनेर.जिल्हा – नागपूर येथे गुन्हा नोद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
आरोपी यांस सापळा रचून पकडणाऱ्या पथकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी संतोष जाधव, पोलीस निरीक्षक , ला.प्र.वी. नागपूर, पर्यवेक्षक अधिकारी भारती गुरनुले , पोलीस उपअधीक्षक ला. प्र. वि. नागपूर, सापळा पथकातील सदस्य पोलीस निरीक्षक संतोष जाधव ,पोलीस निरीक्षक सुष्मा बिसंदरे , HC अनिल बहिरे, WHc अस्मिता, PC विकेश राऊत यांनी दिंगबर प्रधान,पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, श्रीमती माधुरी बाविस्कर,अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, विजय माहुलकर, अपर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेरात मागच्या मे महिन्यातील कारवाई नंतर दुसरी कारवाई करीत महावितरण च्या भ्रष्टाचारी यंत्रणेला सुरुंग लावला.आजच्या एंटीकरप्शन रेड मुळे सध्या शासकीय निमशासकीय कार्यालयात मोठी खळबळ उडाली असुन भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचारी हे मोठ्या धास्तीत आले आहेत.











