श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
खापा-सावनेर/नागपुर : 10 सप्टेंबर 2026.
पोलीस स्टेशन खापा हद्दीत येणाऱ्या कोच्छी डॅम परिसरातील नदीत काल, 9 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता, बैलाला धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱी दिनेश हिरूजी उईके (वय 36), रा. रीसाळा, ता. सावनेर, जि. नागपूर पाय घसरून नदीच्या पाण्यात बुडाल्याची घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच खापा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तसेच स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम राबवली; मात्र काल मृतदेह आढळून आला नाही.
दरम्यान, आज 10 सप्टेंबर रोजी दुपारी 12 दरम्यान बावनगाव नदीच्या काठावर दगडाला अडकलेला मृतदेह आढळून आला. याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांनी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना दिली.
त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच्या मदतीने मृतदेह सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास खापा पोलीस करीत आहेत.












