श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी/नागपुर :21 सप्टेंबर 2026.
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.राजेंद्र पाल गौतम यांचे आदेशानुसार व महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील प्रबोधनकार ख्यातनाम गायक,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष
डॉ.अनिरुद्ध वनकर यांच्या शिफारशीनुसार नागपुर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी पंचायत समिती सदस्य सुमेध मधुकर रंगारी यांची नियुक्ती करण्यात आली.
सुमेध मधुकर रंगारी हे कामठी पंचायत समिती चे माजी सदस्य असुन त्यांच्या आई श्रीमती सरिताताई मधुकर रंगारी ह्या येरखेडा ग्रा.पं.च्या माजी सरपंच तथा येरखेडा जिल्हा परिषद सर्कल मधुन जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत होत्या.
कामठी विधानसभेचे कांग्रेस नेता सुरेश भोयर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी हे धडाकेबाज समाजसेवी व कर्तव्यदक्ष राजकीय व्यक्तिमत्व म्हणुन ओळखले जातात.

महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील प्रबोधनकार ख्यातनाम गायक,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अनिरुद्ध वनकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल नवनियुक्त नागपुर जिल्हा अध्यक्ष सुमेध मधुकर रंगारी यांनी आपले कांग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी, यांचे आभार व्यक्त केले आहे.
काँग्रेस पक्षाचा विचार, आंबेडकरी विचार व राहुल गांधी यांच्या भारत जोडोचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचविणार-सुमेध रंगारी(अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष)
आपली नागपुर जिल्हाध्यक्ष पदी निवड होताच सुमेध रंगारी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की,कांग्रेस चे केंद्रीय नेतृत्व, व वरिष्ठांनी दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत, भारतीय संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांची जपणूक करीत मी काँग्रेस पक्षाचा विचार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा व आमचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडोचा संदेश तळागाळातील शोषित, वंचित, उपेक्षित, दलित, आदिवासी व बहुजन समूहापर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिक कार्य या पदाच्या माध्यमातून निष्ठेने करील, हा माझा दृढ संकल्प आहे असेही सुमेध रंगारी यांनी यावेळी सांगितले.
माजी पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी यांची अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पदी निवड होताच त्यांच्यावर सर्व सामाजिक, राजकीय वर्तुळातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













