■ 9 वर्षांची गौरवशाली वाटचाल, १० व्या वर्षात पदार्पण
■ आज विशेष एकदिवसीय सामूहिक ध्यान साधना महाशिबिर
श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी/नागपुर :22 सप्टेंबर 2026.
नागपुर च्या क्षाभूमीनंतर बौद्ध धम्म आणि वैश्विक शांतीचे प्रमुख केंद्र म्हणून नावारूपास आलेल्या कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील ‘आंतरराष्ट्रीय विपश्यना मेडिटेशन सेंटर’ आज 22 सप्टेंबर रोजी 10 व्या वर्षात गौरवशाली पदार्पण करत आहे. गेल्या 9 वर्षांत केंद्राने जगभरातील हजारो साधकांच्या जीवनात मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविकासाची नवी पहाट फुलवली असून हे केंद्र धम्माचा एक सशक्त प्रकाशस्तंभ ठरले आहे.


माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले होते लोकार्पण!
22 सप्टेंबर 2017 रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पवित्रदीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर दुपारी कामठी येथील विपश्यना केंद्राचे लोकार्पण केले. विपश्यना ही कुठल्याही एका धर्मापुरती मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे.


भव्य वास्तुकला
83 फूट उंच मुख्य पगोडा, त्याभोवती 10-10 फुटांचे चार उप-पगोडे आणि त्यावर 80 कलाकारांनी सुवर्ण मुलामा (गोल्ड पॉलिश) केला आहे.
आहे.
अष्टधातूचे छत्र
मुख्यपगोड्याच्या शिखरावर अष्टधातूचे पवित्र छत्र स्थापित करण्यात आले
साधना कक्ष:
येथे एकाच वेळी 125 हून अधिक साधक बसून ध्यान करू शकतील असे दोन प्रशस्त ध्यान कक्ष
सकाळी 9 ते सायंकाळी 4:30 पर्यंत शिबिर
ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर येथे 10 व्या वर्धापन दिनानिमित्त आज मंगळवारी (तारीख 22) विशेष ध्यान साधना शिबिरो आयोजन सकाळी 9 ते सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. शिबिरात विशेषतः सहायक आचार्य, बाल शिबिर शिक्षक, किमान एक 10 दिवसीय शिबिर पूर्ण केलेले जुने साधक-साधिका तसेच विपश्यना केंद्रात सेवा देणारे धम्मसेवक यांना निमंत्रित करण्यात आले आहे. धम्मलाभ घ्यावा, असे आवाहन ॲड . सुलेखा कुंभारे यांनी केले आहे.
ओगावा सोसायटी आणि ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख, माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांचे परिश्रम आणि पूज्य गुरुजी सत्यनारायण गोयंका यांच्या प्रेरणेतून 10 एकरांच्या विस्तीर्ण परिसरात हे केंद्र उभे राहिले आहे.
द्वितीय बुद्ध शासनाचा जिवंत आधारस्तंभ
पूज्य गुरुजी सत्यनारायण गोयंका सांगायचे की, ‘बुद्धम् शरणम् गच्छामी’ च्या घोषासह शतकांनंतर बुद्ध शासनाचा पुनरुद्घोष नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला. ड्रॅगन पॅलेस विपश्यना केंद्र त्याच द्वितीय बुद्ध शासनाचा एक मजबूत स्तंभ म्हणून पुढे आले आहे.












