श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
रामटेक /नागपुर : 22 सप्टेंबर 2026.
नागपुर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील चिचाळा येथील प्रशांत कुवरलाल मसुरके यांचा नगरधन येथील आठवडी बाजारात गरम तेलाच्या कढईत पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. दिवंगत प्रशांत हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील व कुटुंबीय आहेत.
या दुर्दैवी घटनेची दखल घेत त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळावी, यासाठी रामटेक विधानसभेचे आमदार तथा राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सातत्याने शासन व प्रशासनाला पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले असून मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांच्या कुटुंबीयांना रु. 1 लाखांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले.
दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी रामटेक येथील संपर्क कार्यालयात मसुरके कुटुंबीयांची भेट घेऊन रु. 1 लाखांच्या मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. नेहमी गोरगरिब निराधार नागरिकांना वेळोवेळी मदतीचा हात पुढे करणारे राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या कडे हक्काचा “आपला आशिष भाऊ” म्हणुन जनतेत घट्ट ओळख आहे.












