श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 26 सप्टेंबर 2026.
जिल्हा परिषद नागपूरच्या आरोग्य विभागाने मॉड्युलर OT आणि स्मार्ट PHCच्या माध्यमातून ग्रामीण आरोग्यसेवेला गुणवत्तापूर्ण व नागरिकाभिमुख दिशा दिली आहे. जिल्ह्यातील 16 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, या केंद्रांमध्ये नियमितपणे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया (TL – Tubal Ligation) आणि पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया (NSV) यशस्वीरित्या पार पाडल्या जात आहेत.


PHC कान्होलीबारा आणि PHC टाकळघाट येथे आयोजित स्त्री व पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरात एकूण 12 लाभार्थींवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शल्यचिकित्सक डॉ. नंदेश्वर तसेच वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे शहरी रुग्णालयांच्या तोडीच्या आरोग्य सुविधा आता ग्रामीण भागातही उपलब्ध होत आहेत.
या व्यापक प्रयत्नांचा एक महत्त्वपूर्ण परिणाम म्हणून जिल्ह्यातील 77 आरोग्य सुविधा NQAS प्रमाणित झाल्या आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचे पायाभूत सक्षमीकरण, सेवांच्या गुणवत्तेत वाढ आणि आवश्यक आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या या प्रयत्नांतून “आरोग्यसेवा शेवटच्या माणसापर्यंत” हे ध्येय प्रत्यक्षात साकारण्याच्या दिशेने जिल्हा परिषद नागपूरची वाटचाल सुरू आहे.
या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी जिल्हा परिषद नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी IAS_Mahamuni (भा.प्र.से.) यांनी घेतलेला पुढाकार, त्यांचे अथक परिश्रम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोद यांच्या सहकार्याने सुरू असलेले हे कार्य कौतुकास्पद आहे. यासाठी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा परिषद नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिनंदन केले तसेच ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या या प्रयत्नांना शुभेच्छा ही दिल्या.












