श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS DIGITAL WEB PORTAL ONLINE.
सावनेर/नागपुर : 27 सप्टेंबर 2026.
नागपुर जिल्ह्यातील सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नासिर ढाब्याजवळ 27 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास कार पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कोळी यांना माहिती दिली. त्यानंतर हितज्योती आधार फाउंडेशनची टीम आणि महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना टीमच्या मदतीने तातडीने सावनेर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, लघुशंकेसाठी थांबलेल्या व्यक्तीला कारने धडक दिली. त्यानंतर कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर विजय बिंदेश्वर सिंग (वय 42, रा. मिलन चौक, खापरखेडा) यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अपघातग्रस्त कारचा क्रमांक एमपी 04 TA 8406 असून, कारचालक कृष्णदेव भुजवा (वय 26, रा. भोपाळ) असल्याची माहिती आहे.
या अपघातात दुचाकीवर असलेले विजय सुंदरलाल डहरवाल (वय 48, रा. चनकापूर, खापरखेडा) तसेच कारमधील संध्या प्रदीप वेधी (वय 59, रा. भोपाळ) आणि प्रदीप वेधी (वय 68, रा. भोपाळ) जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेचा पुढील तपास सावनेर पोलीस आणि महामार्ग पोलीस करीत आहेत.












