श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
गोधनी/नागपुर : 29 सप्टेंबर 2026.
नागपुर शहरातील मानकापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोधणी परिसरात एक भीषण अपघाताची दुर्देवी घटना घडली आहे. अॅक्टिव्हा स्कूटरवरून प्रवास करणाऱ्या दोन तरुणींना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात एक तरुणी जागीच मृत पावली, तर दुसरी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृत तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहन चालकाचा शोध घेत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून वाहन चालकाचा शोध वेगाने सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, सदर तरुणी ही झुलेलाल काँलेज ची विद्यार्थीनी असल्याचे बोलले जात आहे. घटनेत दुसरी मुलगी ही गंभीर जखमी झाल्याचे समजते. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. म्रृतक मुलीबद्दल लवकरच अपडेट देण्यात येईल.
गोधनी रोडवरील अतिक्रमण केव्हा हटणार? नागपुर ते गोधनी रोडवर अवैध ठेले, दुकाने, तसेच अवैध पार्किंग यामुळे अरुंध अशा या रोडवर नेहमी अपघात होतात. या मार्गावरील अतिक्रमण NHAI तथा गोधनी नगरपंचायत ने अतितात्काळ काढावी अशी नागरिकांची मागणी आहे.











