श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
महादुला-कोराडी /नागपुर : 6 आँक्टोबर 2026.
नागपुर जिल्ह्यातील कोराडी छिंदवाडा राष्ट्रीय महामार्ग क्र. 67 वर 4-5 ठिकाणी बनविण्यात आलेले FOB (पादचारी मार्ग) सध्या निरुपयोगी कुचकामी ठरलेत. या राष्ट्रीय महामार्गावर नेहमी शाळा काँलेज मध्ये जाणारे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन राष्ट्रीय महामार्ग !आजही पायी ओलांडतात. करोडो रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेले FOB आज निरुपयोगी ठरत आहेत.
राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला 5-6 शाळा काँलेज आहे परंतु या शाळा काँलेजच्या विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडण्यापेक्षा FOB पादचारी मार्गाचा वापर करणे गरजेचे असतांना मागील 4-5 महिन्यापासून या FOB चा वापर विद्यार्थी, नागरिक करीतच नाही असे दिसुन येते. विद्यार्थी व नागरिक आजही हा राष्ट्रीय महामार्ग पायदळ ओलांडताना दिसतात. त्यामुळे या महामार्गावर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. भरधाव वेगाने वाहणारी वाहने विद्यार्थ्यांंसाठी थांबत नाही.

राष्ट्रीय महामार्गावर अंडर ब्रीज बनविण्यासाठी झाले होते आंदोलन!
मागे 2 वर्षापुर्वी कोराडी हायवेवर विद्यार्थी नागरिक जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडतांनाचा विडिओ बातमी वायरल झाल्यानंतर नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरासमोर वंजारी भवन येथे कांग्रेस चे माजी मंत्री सुनील केदार,सुरेश भोयर, कुंदा राऊत, अवंतिका लेकुरवाळे यांच्या नेतृत्वाखाली अंडर ब्रीज बनविण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. परंतु या ठिकाणी अंडर ब्रीज न बनवता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी NHAI च्या माध्यमातून छिंदवाडा हायवेवरील (कोराडी रोड, नागपूर) येथे फुट ओव्हर ब्रिज (FOB) मंजुर केले. FOB च्या निर्माणावर एकूण ₹7.5 कोटी खर्च झाल्याचे समजते.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) या व्यस्त मार्गावर पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी एकूण 5 नवीन Steel फुट ओव्हर ब्रिज (FOBs) मंजूर केले होते, ज्यांचे बांधकाम ‘ओरिएंटल स्ट्रक्चरल इंजिनियर्स प्रा. लि.’ मार्फत करण्यात आले आहे. मॉडर्न स्कूल चौक, पांजरा बस स्टॉप बोखारा , सरस्वती शाळा काँलेज बोखारा, कोराडी पांजरा, चक्रधर किराणा स्टोअर्सजवळ), वंजारी भवन(बावनकुळे यांच्या बंगल्याजवळ) अशा 5 ठिकाणी FOB बनलेत.
वाहतुकीची कोंडी आणि अपघात कमी करण्यासाठी हे पूल आधुनिक स्टील स्ट्रक्चर्सचा वापर करून बनवले गेले आहेत. आज ते कुचकामी व निरुपयोगी ठरलेत.
FOB चा वापर करण्यासाठी स्थानिक ग्रा पं., नगरपंचायत प्रशासनाची जनजागृती नाही.
एरवी छोट्या छोट्या गोष्टी साठी LIVE Video करणारे येथील भाजप,कांग्रेसचे कार्यकर्ते FOB चा वापर करण्यासाठी कोणताही LIVE Video करतांना दिसत नाही. स्थानिक बोखारा, नवीन कोराडी, पांजरा कोराडी ग्रा पं. तथा महादुला नगरपंचायत प्रशासनाने याबाबत विद्यार्थ्यांना शाळा काँलेजमध्ये FOB (पादचारी मार्ग) चा वापर किती फायदेशीर आहे? अशी कोणतीच जनजागृती करतांना दिसुन येत नाही. स्थानिक प्रशासन किंवा स्थानिक कोराडी पोलिस स्टेशन, वाहतुक पोलीस याबाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिसत नाही.
बेकायदेशीर बैनर बाजी साठी होतो FOB चा वापर!
मागील 4-5 महिन्यापासून भाजप कांग्रेस शिवसेना आदी सर्वच राजकीय पक्षांचे बैनर पब्लिसिटी साठी या नवनिर्मित FOB वर बांधण्यासाठी सर्रास होतांना दिसतो. विशेष म्हणजे हे बैनर बांधण्यासाठी NHAI (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची) कोणतीही परवानगी घेतली जात नाही. मग अशा बैनर बाजी वर NHAI कारवाई करणार का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांत चर्चेचा विषय ठरतोय.


पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे महत्वकांक्षी 5 FOB चा वापर विद्यार्थ्यांना न होता केवळ बैनर बाजी साठी होतो हे स्वतः दरदिवशी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्या उघड्या डोळ्यांनी बघतात. मग FOB नेमके कशासाठी बनविले विद्यार्थ्यांंसाठी कि राजकीय पक्षांच्या बैनरबाजीसाठी? यांवर सर्वच राजकीय पक्ष, नेते स्थानिक जनप्रतिनिधी यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.












