श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 7 आँक्टोबर 2026
यंदा नागपुर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भाजप महायुतीला जड जाण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. कारण या निवडणुकीत शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या भाजपला बंडखोरी चा मोठा फटका बसु शकतो. भाजप ने नागपुर पदवीधर मतदारसंघातुन उमेदवारी देतांना उशीर लावला. वर्षभरापासून या निवडणुकीचे तयारी करणारे पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार प्रा. अनिल सोले यांना उमेदवारी न देता ऐनवेळी सुधाकर कोहळे यांना उमेदवारी जाहीर केल्याने प्रा. अनिल सोले यांनी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत थेट भाजप नेत्यांना आव्हान दिले.भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण भाजप आमदार राजीव पोतदार हे प्रा. अनिल सोले यांचे घरी त्यांची समजुत काढण्यासाठी गेले. परंतु प्रा. अनिल सोले त्यांना घरी भेटले नाहीत. प्राण. अनिल सोले यांनी रविंद्र चव्हाण यांना रिकामे पाठविल्याची चर्चा आहे कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.भाजपचे सुधाकर कोहळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतांना भाजप ने कोणतेही शक्तिप्रदर्शन यावेळी केलेले नाही हे विशेष. भाजप व RSS चे अँड. रमण सेनाड यांनी ही आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपला मोठा झटका बसला. ॲड. रमण सेनाड हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) एक ज्येष्ठ स्वयंसेवक आणि नागपुरात 25-30 वर्षापासुन कार्यरत जेष्ठ नेते आहेत. त्यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती परंतु त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी सुद्धा उघडपणे आपली नाराजी दर्शवत आपल्या समर्थकांसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचबरोबर भंडारा – गोंदिया जिल्ह्य़ातील शिक्षण-महर्षी बापूसाहेब लाखनीकर यांचे नातू असलेले डॉ. आल्हाद भांडारकर यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज नागपुरातुन दाखल केल्याने भाजप वर ट्रिपल अटैक वाढला. डाँ. आल्हाद भांडारकर यांचे कुटुंब हे जनसंघ, RSS आणि भाजपशी अनेक दशकांपासून जोडलेले असुन त्यांनी सुद्धा नागपुर पदवीधर मतदारसंघातुन भाजपकडे उमेदवारी मागितली होती. त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी सुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून आपली उमेदवारी दाखल केल्याने एरवी शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या भाजपला
आता बंडखोरी चे ग्रहण लागले असेही म्हणावे लागेल.
कांग्रेस महाविकास आघाडीची एकजुटीने अभिजीत वंजारी यांचे पारडे जड!
नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीने मोठे शक्तिप्रदर्शन करीत कांग्रेसचे अभिजीत वंजारी यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती!
नागपुर पदवीधर मतदारसंघातुन ॲड.अभिजीत वंजारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार, आमदार विकास ठाकरे, आमदार संजय मेश्राम,माजी मंत्री सुनील केदार,माजी मंत्री राजेंद्र मुळक, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे, माजी आमदार अशोक धवड यांच्यासह जेष्ठ सहकार क्षेत्रातील नेते हुकुमचंद आमधरे, सलील देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी सभापती अवंतिका लेकुरवाळे यांचेसह काँग्रेसचे अनेक नेते आजीमाजी नगरसेवक उपस्थित होते. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही उपस्थित राहून वंजारी यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत वातावरण निर्मिती केली. नेत्यांच्या उपस्थितीमुळे निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवातच शक्तिप्रदर्शनाने झाल्याचे चित्र दिसून आले.
भाजपचा बालेकिल्ल्यात काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी लावला होता सुरुंग!

नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघ हा काही दशकापासून भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुर पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर प्रा.अनिल सोले यांनी भाजपचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळे या मतदारसंघातील काँग्रेसची कामगिरी नेहमीच आव्हानात्मक राहिली. 2020 च्या कोरोना काळात राजकीय समीकरण बदलले. पहिल्यांदाच ॲड.अभिजीत वंजारी यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार संदीप जोशी यांचा तब्बल 19 हजार मतांनी दारुण पराभव करत हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आणला. या निवडणुकीत काँग्रेस चे अभिजीत वंजारी यांना एकुण 61,701 मते मिळाली तर भाजप चे संदीप जोशी यांना 42,791 मते मिळाली. भाजपच्या पारंपरिक गडाला धक्का देत वंजारी यांनी मिळविलेल्या विजयामुळे भाजपच्या गडाला अक्षरशः सुरुंग लावला. तीन मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर करताना काँग्रेसने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी अभिजीत वंजारी यांची सातत्यपूर्ण यशस्वी कामगिरी बघत पुन्हा एकदा त्यांचे नाव जाहीर करीत मोठा विश्वास दाखवला.
भाजपच्या पारंपरिक गडाला धक्का देत अभिजीत वंजारी यांनी मिळविलेल्या या ऐतिहासिक विजयामुळे तसेच महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे सध्या अभिजीत वंजारी यांचे नागपुर पदवीधर मतदारसंघात पारडे जड आहे.

नितेश कराळे मास्तर यांची उमेदवारी फक्त चर्चेचा विषय! केवळ प्रसिद्धीच्या जोरावर मते घेण्यात अपयश!
वर्धेचे नितेश कराळे मास्तर हे सध्या सोशल मीडिया मध्ये प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते आहेत. गत 2020 च्या निवडणुकीत त्यांना फक्त 4314 मते मिळाली होती. ते 2020 च्या नागपुर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत चौथ्या नंबरवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच नागपुर शहर अध्यक्ष सलिल देशमुख यांचे नितेश कराळे यांच्या उमेदवारीला समर्थन नाही. ते स्वतः महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी यांच्या नामनिर्देशन रैलीत सहभागी झाले होते. त्यामुळे नितेश कराळे मास्तर यांना स्वतःच्या पक्षाचा पाठिंबा नसल्याने त्यांची उमेदवारी या निवडणुकीत आव्हानात्मक दिसुन येत नाही. वादग्रस्त विधानामुळे सध्या च ते जामिनावर तुरंगातुन बाहेर आले. यावेळी नेमके सोशल मीडिया मध्ये प्रसिद्धीच्या जोरावर ते 10 हजार मतांचा तरी आकडा गाठतात कि नाही? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.











