श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 7 आँक्टोबर 2026.
भाजप महायुतीचे नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या उमेदवारीवर अपक्ष उमेदवार रोहन साठवणे यांनी गंभीर आक्षेप घेतला आहे.आधीच भाजप ला बंडखोरी ने ग्रासले असुन आता अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांचा उमेदवारी अर्जावर आक्षेप आल्यामुळे ते सध्या अडचणीत आले आहेत.
भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांनी 2024 मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी नामनिर्देशन पत्रात दाखल केलेले आयकर रिटर्न (ITR) आणि आता पदवीधर निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात सादर केलेले ITR यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत (तफावत/विसंगती) असल्याचा दावा साठवणे यांनी केला आहे.
या राजकीय घडामोडीतील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
आक्षेपाचे मुख्य कारण: सुधाकर कोहळे यांनी दोन वेगवेगळ्या निवडणुकांच्या प्रतिज्ञापत्रात (Affidavits) दर्शवलेल्या उत्पन्नाच्या आणि आयटीआर (ITR) च्या आकडेवारीत तफावत आढळली आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार:
भाजप महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारे अपक्ष उमेदवार रोहन साठवणे

अपक्ष उमेदवार रोहन साठवणे यांनी या विसंगतीबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे रीतसर आक्षेप नोंदवला असून कोहळे यांचे नामनिर्देशन पत्र बाद करण्याची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे.
वाढती राजकीय खळबळ: नुकतीच भाजप पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोहळे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र, ऐन उमेदवारी अर्ज छाननीच्या प्रक्रियेत हा तांत्रिक आक्षेप आल्यामुळे कोहळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रावर निर्णय घेण्याचा RO ना अधिकार नाही, आक्षेप घेणाऱ्यांना कोर्टात जाण्याचा सल्ला.
यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार रोहन साठवणे यांच्या आक्षेपावर RO (निवडणुक निर्णय अधिकारी) यांनी छाननी वेळी सुधाकर कोहळे यांचा उमेदवारी अर्ज होल्डवर ठेवला होता. त्यानंतर RO यांनी सांगितले की, उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रतित्रापत्रावर निर्णय देण्याचा अधिकार नसुन आक्षेप घेणारे प्रतिस्पर्धी उमेदवार रोहन साठवणे यांनी कोर्टात जावे. यांवर अपक्ष उमेदवार रोहन साठवणेंचे समाधान झाले नाही. सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार, आता अपक्ष उमेदवार रोहन साठवणे हे सुधाकर कोहळे यांचे विरोधात कोर्टात जाऊ शकतात? यांबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. .











