भाजपातील अंतर्गत धुसफुस व गटबाजी पहिल्यांदा येत आहे समोर!
श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 9 आँक्टोबर 2026.
नागपुर पदवीधर विधानपरिषद निवडणुकीसाठी मागील काही वर्षांपासून तयारी करीत असलेले प्रा. अनिल सोले यांना भाजपने उमेदवारी न देता यावेळी “ओबीसी कार्ड” खेळले. गत निवडणुकीत संदीप जोशी (ब्राम्हण चेहरा) पदवीधर मतदारांनी नाकारला त्यामुळे यावेळी जातीचे कार्ड खेळण्यासाठी स्वतः माजी प्रदेशाध्यक्ष तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रेट्यामुळे उमेदवारी माजी आमदार सुधाकर कोहळे यांना खेचुन आणली. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते असलेली लाँबी (गडकरी लाँबी)मध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरु होती. अशातच प्रा. अनिल सोले यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत शिस्तीत निवडणुक लढण्याचा निर्णय मीडिया समोर बोलुनही दाखवला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे प्रा. अनिल सोले यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी सुद्धा जाऊन आले होते त्यांची मनधरणी करण्यासाठी. परंतु प्रा. अनिल सोले यांनी त्यांना भेट नाकारल्याने रिकाम्या हाताने रविंद्र चव्हाण यांना परतावे लागले. अशातच आज नागपुर पदवीधर मतदारसंघातुन उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस असतांना अपक्ष उमेदवार प्रा.अनिल सोले यांनी आपला नामांकन अर्ज मागे न घेतल्याने भाजप मध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली. दुसरीकडे शिस्तबद्ध भाजपमधील अंतर्गत गटबाजी बंडाळी उफाळून आली. भाजप चे वरिष्ठ नेते गिरीश व्यास यांनी भाजप चा राजीनामा देत अपक्ष उमेदवार प्रा. अनिल सोले यांना पाठिंबा देत आपला इरादा स्पष्ट केला. त्यामुळे भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या पुढे मोठे धर्मसंकट निर्माण झाले.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गिरीश व्यास यांनी पक्षाला रामराम ठोकला असून आपल्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार प्रा. अनिल सोले यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
प्रा. अनिल सोले यांचे बंड हे भाजप चे हेवीवेट कैबिनेट महसुलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेत्रृत्वाला थेट आव्हान असल्याचे बोलले जात आहे. जुन्या नेते व कार्यकर्ते यांना डावलून नव्याने आलेल्यांना प्राधान्य देण्याची भाजप मध्ये प्रथा निर्माण झाल्याने भाजप अंतर्गत गटबाजी खुलुन पुढे आली आहे. निवडणुकीआधी भाजपात खदखद तर नाही ना? आता डैमेज कंट्रोल ला वेळ नाही. निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्याने आता भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांना पराजयाचा सामना करण्याची वेळ येऊ शकते तर दुसऱ्यांदा कांग्रेसचे अभिजीत वंजारी यांना विजयाचा गुलाल लागण्याची नागपुरच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे.
बंडखोरीला बळ:
भाजपने नागपूर पदवीधर मतदारसंघातून माजी आमदार सुधाकर कोहळे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. मात्र, तिकीट न मिळाल्यामुळे माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी अपक्ष म्हणून बंडखोरी करत अर्ज दाखल केला. आता गिरीश व्यास यांच्या राजीनाम्यामुळे आणि पाठिंब्यामुळे अनिल सोले यांच्या मोहिमेला मोठे बळ मिळाले आहे.
मुख्य प्रचार कार्यालय:
नागपूर विधानपरिषद निवडणुकीतील भाजप चे अपक्ष उमेदवार प्रा. अनिल सोले यांचे मुख्य निवडणूक प्रचार कार्यालय देखील गिरीश व्यास यांच्या महाल (बडकस चौक, नागपूर) परिसरातील वैयक्तिक कार्यालयातून सुरू करण्यात येत आहे.आज या कार्यालयाचे उद्घाटन आहे.
पक्षांतर्गत वाद:
9 ऑक्टोबर 2026 रोजी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असताना, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोले यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले, परंतु सोले संपर्काबाहेर राहिले. व्यास यांच्या या पावलामुळे भाजपमधील जुने निष्ठावंत कार्यकर्ते बंडखोराच्या पाठीशी उभे राहत असल्याचे चित्र निर्माण झाले असून भाजपसमोरील अडचणी वाढल्या आहेत.











