श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
रामटेक/नागपुर : 11 आँक्टोबर 2026.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रामटेक तालुका प्रमुख हेमराज चोखांद्रे यांचा आज खा. श्यामकुमार बर्वे व माजी राज्य मंत्री राजेंद्र मुलक यांच्या हस्ते व अन्य काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी
प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश झाला.


हेमराज चोखांद्रे हे एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व असून त्यांनी ह्यापूर्वी विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले असून राजकीय क्षेत्रात देखील त्यांनी विविध पदे भूषविली असून समाजात त्यांनी आपली एक उत्तम ओळख निर्माण केलेली आहे.
हेमराज चोखांद्रे हे ह्यापूर्वी ग्राम पंचायत मनसर चे सदस्य होते तर त्यांच्या पत्नी सौ.योगेश्वरी चोखांद्रे ह्या हेमराज चोखांद्रे यांच्या मार्गदर्शनात सरपंच म्हणून थेट जनतेतून निवडून आलेल्या असतांना त्यांनी आपल्या कार्यकाळात अत्यंत समाजोपयोगी व लोकोपयोगी कार्य केलेले आहेत. एक आदर्श महिला सरपंच म्हणून त्यांचे कार्य अजूनही उल्लेखनीय आहे.

हेमराज चोखांद्रे यांनी ह्यापूर्वी विविध निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेले असून त्यांच्या अनुभवांचा फायदा येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात होईल. असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी केला आहे.
तर देशाची व राज्याची सध्यास्थिती बघता पुढील काळात काँग्रेस शिवाय पर्याय नाही. त्यामुळे आपण पुढील आयुष्यात् काँग्रेस पक्षाकरिता अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करू असे विचार हेमराज चोखांद्रे यांनी व्यक्त केले.











