नोकरी करते कारण दाखवून वस्तीग्रृहात राहण्याचा व जेवणाचा खर्च वसुल करण्याची नोटीस,नागपुरातील शासकीय वसतिगृहातील संतापजनक प्रकार!
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपूर : 27 मे 2026.
उन्नति पार्क, बेसा नागपूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वसतिगृहात एक संतापजनक धक्कादायक प्रकार घडल्याने नेमके हे सरकार कुणाचे आहे? एका शेतकऱ्याच्या गरीब मुलीने शासकीय वस्तीग्रृहात असलेल्या असुविधांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार केल्याने तिचा राग मनात धरुन वस्तीग्रृहातील अधिक्षक वार्डन यांनी त्या गरीब मुलीला थेट वस्तीग्रृह सोडण्याची नोटीस पाठवल्याची धक्कादायक व संतापजनक घटना आज नागपुरात घडली. काय ही शेतकऱ्याची मुलगी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण नाही का?एकीकडे भाजप सरकार महिला सक्षमीकरणाच्या बाता ठोकते तर दुसरीकडे शिक्षण घेणाऱ्या वस्तीग्रृहातील एका गरीब मुलीवर आज एकप्रकारे अन्याय करीत शासकीय अधिकारी किती माजलेले व निर्दयी असतात हे आजच्या प्रकरणावरून दिसुन येते.

या तक्रारीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्याचे सांगितले जाते. तसेच विदर्भातील मुलींच्या वसतिगृहांसाठी सुमारे 600 कुलर उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिल्याचे या विद्यार्थिनीने सांगितले. मात्र, यानंतर प्रशासनानेच आपल्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदार विद्यार्थिनी पुढे म्हणाली की, ‘आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन आमच्या अडचणी मांडल्या. इतक्या उष्णतेत कुलर नसल्यामुळे राहणे कठीण झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेतली. पण त्याचा राग प्रशासनाने आमच्यावर काढला. वसतिगृहाच्या प्रशासन यांनी आमच्या कॉलेजमध्ये जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो, हे योग्य नसल्याचे सांगितले. तुम्हाला काही अडचण असेल तर समाजकल्याण विभागाकडे तक्रार करायला हवी होती, थेट मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची गरज नव्हती, असेही आम्हाला सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर ‘जर इथे राहायचे नसेल तर घरी जा’, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीला प्रशासनाकडून बाहेर काढण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. आकांक्षा उके असे या विद्यार्थिनीचे नाव असून, तिने वसतिगृहातील असुविधांबाबत थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. याच तक्रारीचा सूड म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडित विद्यार्थिनीने केला आहे.
उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि वसतिगृहात कूलरची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास, याबद्दल आकांक्षा उके हिने संबंधित प्रशासनाकडे वारंवार दाद मागितली होती. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. अखेर वैतागलेल्या आकांक्षाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवून कूलरची सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती.
आकांक्षा उके हिने असा आरोप केला आहे की, वसतिगृहातील मूलभूत सुविधांची मागणी करणे हा माझा हक्क होता. परंतु, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यामुळे सूडबुद्धीने माझ्यावर ही कारवाई केली जात आहे. शेतकऱ्याची मुलगी असलेल्या आकांक्षाला शिक्षणासाठी वसतिगृहाचा मोठा आधार आहे, अशा परिस्थितीत वसतिगृहातून काढून टाकणे म्हणजे तिच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळण्यासारखे आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.
नागपुर चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सदर घटनेची दखल घेणार का? नागपुरातील एका दलित समाजातील शेतकऱ्याच्या मुलीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय वसतिगृहातील असुविधांबाबत तक्रार केली याचा राग धरुन तिला शासकीय वसतिगृह सोडण्याच्या दिलेल्या नोटीस ची दखल नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेतील काय? असुविधांबाबत तक्रार करणे गुन्हा आहे का? शासकीय वसतिगृहातील नालायक माजलेल्या अधिक्षक व वार्डन यांचेवर पालकमंत्री व मुख्यमंत्री काही कारवाई करतील काय? काय आकांक्षा ऊके ही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लाडकी बहीण नाही का? हेच का तुमच्या सरकारचे महिला सबलीकरण व सक्षमीकरण? काय आकांक्षा ऊके हिला न्याय मिळणार काय तुमच्या रामराज्यात? हेच का तुमचे रामराज्य?
Nagpur #SavitribaiPhuleHostel #AkankshaUke #HostelRow #NagpurNews #MaharashtraPolitics #StudentProtest #EducationIssues #ChiefMinister #DevendraFadnavis #HostelFacilities #JusticeForStudent #NagpurEducation #SocialIssue #MarathiNews
#chandrashekharbawankule












